आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

35 हजार नागरिकांची भटकंती थांबणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - दुथडी भरून वाहणारी गोदावरी उशाला असतानाही सुमारे पस्तीस हजार लोकसंख्येच्या गेवराईकरांचा पाणीप्रश्न चांगलाच गाजत आहे. पाण्यासाठी भटकंती करणा-या गेवराईकरांना आता जायकवाडी धरणातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जालना, अंबड प्रमाणे गेवराईसाठी जायकवाडी धरणातील पाणी येत्या दोन दिवसांत गोदावरी पात्रात सोडण्याचे आदेश दिले आहेत.
दुष्काळसदृश स्थितीमुळे ग्रीन बेल्ट गेवराई शहरातील नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ फिरण्याची वेळ आली. सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या गेवराई शहरात दररोज पाणी देण्याऐवजी तीन दिवसांतून एकदाच पाणी द्या. अंबड, जालन्याप्रमाणे तीस दिवस पुरेल एवढे पाणी साधारणपणे 80 दिवस टिकवता येईल. सध्या पाण्याचे स्रोत आटत चालल्याने मादळमोहीसारख्या भागातील टँकर पाणी आणण्यासाठी थेट गोदावरीला जात आहे. गेवराई शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता जायकवाडीचे पाणी मिळावे, या मागणीवर त्यांनी जोर धरला. जालना, अंबडप्रमाणे गेवराईतील नागरिकांसाठी जायकवाडी धरणातील पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात यावे. अशी मागणी पुढे करून उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी केंद्रेकर गेवराई दौ-यावर असताना आमदार पंडित यांनी भेट घेऊन चर्चा
केली. सध्या गोदावरी नदीली पाणीसाठी गेवराई शहराला लागण्याची स्थिती लक्षात घेता केवळ दहाच दिवस पुरेल एवढा आहे. गेवराई शहरासाठी कायमस्वरूपी तीन दिवसांतून पाणी देण्याचे नियोजन केले तरी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता आहे.
सकारात्मक प्रतिसाद - आमदार अमरसिंह पंडित यांच्यासमवेत पाणीप्रश्नी जिल्हाधिका-यांची भेट घेतली. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. पाटबंधारे विभागाने एकदा पाणी सोडण्याचे मान्य केल्याने काही काळापुरता दिलासा मिळाला आहे. एक्सप्रेस फिडरबद्दलही बोलणे झाले आहे. त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल.’’- अ‍ॅड. लक्ष्मण पवार, प्रमुख, गेवराई विकास आघाडी.