आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलदूत’ने ४ कोटी लिटरचा टप्पा ओलांडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन तातडीचा उपाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या रेल्वेद्वारे पाणीपुरवठ्याच्या उपक्रमाने बुधवारी २४ व्या फेरीत चार कोटी २० लाख लिटर पाणीपुरवठ्याचा टप्पा ओलांडला.

लातूरला मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाल्यानंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका, महावितरण आदी यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. रेल्वेने येणारे पाणी उतरवून घेणे, पाण्याची जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहतूक करणे.

पाणी साठवण्यात येणाऱ्या विहिरीची स्वच्छता आणि डागडुजी, रेल्वे टँकरमधील पाणी साठवण विहिरीपर्यंत वाहून नेण्यासाठी ८०० मीटर लांबीची पाइपलाइन अंथरणे, पाणी वाहतुकीसाठी टँकर पॉइंटची उभारणी करणे, विहिरीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी तीन किलोमीटर लांबीची पाइपलाइन अंथरणे, वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र फीडर उभारण्याची कामे युद्धपातळीवर करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...