आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाकार्यांचे लोकार्पण हाच मानवतेचा कुंभ - सरसंघचालक भागवत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शेतकरी आत्महत्या करतोच कसा? तो स्वतःला एकटा का समजतो? त्याला सहकार्य करण्याची भावना का निर्माण होत नाही? हे चित्र बदलण्यासाठी सर्वांमध्ये सेवाधर्म गरजेचा आहे. सेवाकार्यांचे लोकार्पण म्हणजेच मानवतेचा कुंभ होय, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी केले.

बीड शहरातील छत्रपती िशवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर शनिवारी दुपारी २ वाजता सूर्याेदय परिवाराच्या वतीने विविध याेजनांच्या लाेकार्पण साेहळ्यातील ‘मानवतेचा महाकुंभ’ या कार्यक्रमात भागवत बोलत होते.

व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार रक्षा खडसे, उत्तर प्रदेशच्या प्रतापगडचे खासदार कुंवर हरिवंश सिंग, मध्य प्रदेशचे माजी मंत्री रामकृष्ण कुसुमार्य, खासदार डॉ. सुभाष भांब्रे, दिग्दर्शक मधुर भांडारकर, दीपक चौरसिया, मनीष अवस्थी, दादा पवार, सूर्योदय परिवाराच्या मुख्य प्रशासक ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते. भागवत म्हणाले, समाज उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम असून हे सेवेचे क्षेत्र आहे. राजकारण व वैचारिक मतभेद विसरून शुद्ध भावनेने सगळे लोक एकत्र येत असतात. अगदी तसेच इथे आल्यावर वाटले. निवडणुका लढवाव्या लागतात, प्रचारही करावा लागतो. हे वरवरचे आहे. अापला समाज, आपला देश यांना सोडून सुखी होता येत नाही. धर्म म्हणजे मानवता होय, असेही ते म्हणाले.

राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची अनुपस्थिती
सूर्याेदय परिवाराच्या वतीने बीडमध्ये मागील पंधरा दिवसांपासून मोठा गाजावाजा करून आयोजित करण्यात आलेल्या ‘मानवतेचा महाकुंभ’ या कार्यक्रमाला खुद्द सरसंघचालक मोहन भागवत आले, परंतु एेनवेळी प्रकृती बिघडल्याने राष्ट्रसंत भय्यू महाराज व्यासपीठावर न दिसल्याने शेतकरी निराश झाले.
बातम्या आणखी आहेत...