आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Were Found In Attached Wire; Mobile Phone Battery Explosion

सापडलेली वायर जोडली; मोबाइल बॅटरीचा स्फोट, रेणापूर तालुक्यातील तरुण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
लातूर - सापडलेली वायर मोबाइलच्या बॅटरीला जोडल्याने तिचा स्फोट होऊन तरुण जखमी झाला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी रेणापूर तालुक्यातील नागापूर येथे घडला. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ दिलीप जाधव (३०) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नवनाथला पांढऱ्या रंगाची वायर जोडलेली एक कांडी सापडली होती. त्याने ती कांडी उत्सुकतेपोटी मोबाइलच्या बॅटरीला जोडली. त्यामुळे स्फोट झाल्याने तो यात जखमी झाला. कांडीतून छर्रे िनघाल्याने ते त्याच्या हातापायात घुसले. त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर लातूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

नवनाथला सापडलेल्या कांडीमध्ये स्फोटक पदार्थ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यात डिटोनेटर असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी गावचे पोलिस पाटील शिवाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानवी

जिवाला धोका होईल, अशा पद्धतीने वायर जोडलेली कांडी बाळगल्याप्रकरणी नवनाथवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. वाघमारे यांनी दिली.