आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवसाच्या पावसाची कहाणी: दुष्काळ गेला वाहून, 878 कोटींच्या नुकसानीचे काय‌?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- एक दिवसांच्या पावसामुळे दुष्काळाचे रूपांतर वरवर सुकाळामध्ये झाले असले तरी या पावसाला मोठा विलंब झाला आहे. अगोदरच सरासरी ७० टक्के म्हणजेच तीन लाख ५१ हजार २६६ हेक्टरवरील पिकांचा पाचोळा झाला. यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी ८७८ कोटी १६ लाख ५० हजार रुपये गमावून बसला आहे. 

गेल्या ६० दिवसांत पाऊस पडला नसल्यामुळे ‘दिव्य मराठी’ने शेतकऱ्यांच्या व्यथा, प्रशासनाचा कुचकामीपणा चव्हाट्यावर आणला. तेव्हा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी गेल्या आठवड्यात पथके तयार करून पिकांची पाहणी करण्याचे आदेश दिले. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हलकी, मध्यम भारी जमिनीच्या दृष्टीने पिकांची पाहणी झाली. यामध्ये उडीद, मूग पूर्णत: हातचे गेले असल्याचे समोर आले आहे. तसेच सोयाबीन, मका, खरीप ज्वारी, बाजरी अशा पिकांमध्ये तिन्ही प्रकारच्या जमिनीत ६० ते ८० टक्के नुकसान झाल्याचे दर्शवण्यात आले आहे. म्हणजेच एकूण पेरणीचा विचार करता जिल्ह्यात सर्वच पिकांचे सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.
 
एकूण पेरणी झालेल्या पाच लाख एक हजार ८०९ क्षेत्रापैकी सरासरी तीन लाख ५१ हजार २६६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. एक हेक्टरवर पेरणी, अगोदरची नंतरची मशागत, खते, बियाणे, देखभाल, मजूरीचा विचार करता सुमारे २५ हजार रुपये खर्च करावा लागतो. याच हिशेबानुसार शेतकऱ्यांचे ८७८ कोटी १६ लाख ५० हजार रुपये पाण्यात गेले आहेत. ही आकडेवारी केवळ खर्चाची असून उत्पादकतेचा विचार केला तर एकूण नुकसानीचा आकडा ३६०० कोटींच्याही पुढे आहे. पाऊस वेळेवर आला असता तर कदाचित हा पैसा वाचला असता. 

नुकसान अहवाल शासनाकडे 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. उडीद, मुग पूर्णपणे गेल्याचा अन्य पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाला दिला आहे. मदतीचा निर्णय त्या स्तरावरुन होईल. 
- राजेंद्र खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी. 

रब्बीच्या अगोदर हवी मदत 
दुष्काळी परिस्थिती, अर्धवट कर्जमाफी, तूर खरेदीतील गोंधळ, पिकविम्याची किचकट प्रक्रिया, पावसाच्या खंडामुळे शेतकरी बेजार आहे. रब्बी पेरणीची क्षमता त्याच्यात नाही. शासनाने सरसकट कर्जमाफी करून रब्बी हंगामाअगोदर भरीव मदत गरजेची आहे. 

प्रक्रिया मंदावली? 
नुकसान भरपाईची प्रक्रिया मंदावली. वास्तविक ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानामुुळे राष्ट्रीय, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषांप्रमाणे नुकसान भरपाई देय आहे. मात्र, दिवसाच्या पावसाने प्रक्रिया बंदचा घाट घातल्याची चर्चा आहे. 

सोयाबीनचे अधिक नुकसान 
सोयाबीनची लाख २४ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी झाली. पाऊस नसल्याने जिल्ह्यात ४१ हजार हेक्टरवरील सोयाबीन शेतकऱ्यांनी मोडले. अन्य क्षेत्रावरील ८० टक्के वाढ खुंटली. वाढलेल्या पिकांची फुलगळ झाली. यात शेतकऱ्यांचे ५०० कोटींचे नुकसान झाले. 

पथकाच्या पाहणीत धक्कादायक बाबी आल्या समोर 
७० टक्केसरासरी नुकसान 
८७८ कोटीरुपये पाण्यात 
३.५१ लाखहेक्टरवर नुकसान 
५.०१ लाखहेक्टरवर पेरणी 
बातम्या आणखी आहेत...