आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीची रणधुमाळी: मराठवाड्यातील मतदान केंद्रे सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्ह्याच्या ९ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी मतदान होत आहे. एकूण २५ लाख ११ हजार ०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १३ लाख ७ हजार १३५ पुरुष व १२ लाख ३ हजार ८५३ महिला मतदारांचा समावेश आहे. या वेळी २१ तृतीयपंथीयही मतदानात सहभागी होत आहेत.

निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात एकूण १३ हजार अधिकारी-कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली. या कर्मचारी-अधिका-यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या २३० बस, ४४ मिनीबस, ३९८ खासगी वाहने ठेवण्यात आली. मंगळवारी दुपारपासूनच मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी-कर्मचारी निवडणूक साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झाले.
निवडणुकीसाठी बंदोबस्त
अपर पोलिस अधीक्षक- २, सहायक पोलिस अधीक्षक- ३, पोलिस उपअधीक्षक- १०, पोलिस निरीक्षक- ३९, पोलिस उपनिरीक्षक- २२६, पोलिस कर्मचारी- ३२.२, पुरुष होमगार्ड- १०००, महिला होमगार्ड- २००, सीमा सुरक्षा दल- ३ कंपनी, मध्य प्रदेश राज्य राखीव दल- २ कंपनी, रेल्वे सुरक्षा दल- १ कंपनी, तेलंगणा राखीव पोलिस दल- १ कंपनी, एसआरपीएफ- १ कंपनी.

जिल्ह्यात ३०६३ ईव्हीएमद्वारे मतदान
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी ९ मतदारसंघांत ३०६३ ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यासोबत ५०५६ बॅलेट युनिटचा वापर करण्यात येणार आहे.
मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशीन : नांदेड उत्तर, लोहा, देगलूर, किनवट- २, हदगाव, भोकर, नायगाव, मुखेड- १. एकमात्र नांदेड दक्षिण मतदारसंघात मतदानासाठी ३ बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात ६९ संवेदनशील केंद्रे
मतदानासाठी जिल्ह्यात एकूण २७४८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. किनवट- ३०७ (१२), हदगाव- २६६ (५), भोकर- २७८ (१३), नांदेड उत्तर- ३२४ (१०), नांदेड दक्षिण-२९१ (१६), लोहा- २८२ (५), नायगाव- ३२७ (६), देगलूर- ३२९ (४), मुखेड- ३२१ (६) कंसातील आकडे संवेदनशील मतदान केंद्रांचे आहेत.
आदर्श मतदान केंद्राची स्थापना
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एका आदर्श मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली. किनवट शहरात जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. या ठिकाणी रांगोळी, वाद्यांसह मतदारांचे स्वागत, मतदारांसाठी स्वागत कक्ष, अपंग मतदारासाठी व्हीलचेअर, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदींची व्यवस्था करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र ही संकल्पना राबवण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

मतदारसंघनिहाय मतदार
किनवट- २,४४,३७१ (१,१६,९९९), हदगाव- २,६६,५३४ (१,२५,७७७), भोकर- २,६३,४२४ (१,२५,७९६), नांदेड उत्तर- ३,३१,६५१ (१,५७,९९९), नांदेड दक्षिण- ३,००,८८८ (१,४४,१७५), लोहा- २,५९,१७९ (१,२३,९८५), नायगाव- २,७९,९८५ (१,३६,३५२), देगलूर- २,९०,३४२ (१,४०,८७६), मुखेड- २,७४,६३४ (१,३१,८९४)

मतदारसंघनिहाय उमेदवार
एकूण १६४ उमेदवार रिंगणात आहेत. किनवट- १७, हदगाव- ११, भोकर- १०, नांदेड उत्तर- ३७, नांदेड दक्षिण- ३९, लोहा-१७, नायगाव- ८, देगलूर- १६, मुखेड- १५.
पुढे वाचा लातूर आणि परभणीमधील परिस्थिती...