आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीसाठी सेवानिवृत्त शिक्षक, पत्नी व भावाला मृत दाखवले; महिलेवर फसवणुकीचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जमिनीसाठी येळंबघाट येथील एका सेवानिवृत्त शिक्षकासह त्याची पत्नी व भावाचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून त्यांच्या जमिनीवर दावा सांगणाऱ्या बहिणीवर नेकनूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला अाहे.    

 येळंबघाट येथील    जिल्हा परिषद  शिक्षक सूर्यभान गणपती जोगदंड हे  २००० मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांची    वानगाव येथे ९ एकर तर  भाऊ मधुकर जोगदंड यांची पाच एकर जमीन आहे.  सूर्यभान व त्यांच्या पत्नी सत्यभामा व बंधू मधुकर  हे तिघे सध्या हयातआहेत. पारुबाई सखाराम पवार  (रा. पालवन, ता. बीड) या महिलेने आॅक्टोबर २०१७ मधील पहिल्या आठवड्यात वानगावचे तलाठी एन.के. तांदळे यांच्याकडे वारसदार म्हणून सूर्यभान व मधुकर यांच्या मालमत्ता मिळकतीसाठी अर्ज केला होता.  सूर्यभान व सत्यभामा हे दांपत्य तसेच मधुकर  हे मृत असल्याचे बाँडवर लिहून दिले. यापैकी सूर्यभान हे ७ एप्रिल १९७५ रोजी मृत झाल्याचे भासवण्यात आले.  तलाठी तांदळे यांना जोगदंड कुटुंबीयांविषयी बऱ्यापैकी माहिती होती. त्यामुळे त्यांना या प्रकरणात संशय आला. त्यांनी ११ आॅक्टोबर २०१७ रोजी वानगावात जाऊन चावडीवर ग्रामस्थांचे जबाब नोंदवले. यात हे तिघेही जिवंत असल्याचे समोर आले. हा प्रकार कळताच सूर्यभानयांनी पत्नी सत्यभामा व भाऊ मधुकर हे हयात असल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून घेत नेकनूर पोलिसांना प्रकार सांगितला.  

पारुबाईकडून न्यायालयाचीही  दिशाभूल    
पारुबाई पवार या महिलेने  सूर्यभान जोगदंड व त्यांचे बंधू मधुकर यांची संपत्ती लाटण्यासाठी दिवाणी न्यायालयात तीन स्वतंत्र अर्ज केले असून आपण सूर्यभान व सत्यभामा यांची एकुलती एक मुलगी असल्याचे भासवले. मधुकर यांना मूलबाळ नसून आपण त्यांची पुतणी असल्याने त्यांच्या संपत्तीचा वारसाहक्क आपल्याला द्यावा, असा दावा केला.  
बातम्या आणखी आहेत...