आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहित मुलीवर अतिप्रसंग करणा-या पतीची पत्‍नीने केली कु-हाडीने हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- दारूच्या नशेत विवाहित मुलीवर अतिप्रसंग करणा-या पतीची पत्नीने कु-हाडीने हत्या केली. टाकळी येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी केज पोलिसांनी मुलीच्या आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

विनायक कारभारी बारगजे (47) असे मृताचे नाव आहे. शेतकरी विनायकला पाच मुली, एक मुलगा आहे. त्याची विवाहित मोठी मुलगी (25) धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी आली होती. बुधवारी रात्री पत्नी व मुलगी दोघीच घरात झोपल्या होत्या. तेव्हा विनायकने मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मुलीची ओरड ऐकून मदतीसाठी आलेली पत्नी काशीबाई (42) हिलाही विनायकने मारहाण केली. संतापलेल्या काशीबाईने त्याचे डोके, मानेवर कु-हाडीचे वार केले. यात विनायकचा मृत्यू झाला. विनायकचा स्वभाव विकृत असल्याचे पोलिसांनी सांगितले.