आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीचा खून करून पती ठाण्यात हजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन - पतीवर संशय घेणार्‍या पत्नीचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना बिडकीन येथे शुक्रवारी पहाटे घडली. त्यानंतर पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर होत पत्नीचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली. तुकाराम अवचिंदे (आचलगाव, ता. वैजापूर. ह.मु.बिडकीन) असे खून करणार्‍याचे नाव आहे.

ढोरकीन येथील सुभाष नाडे यांची मुलगी सुशीला (२२) हिचा विवाह दोन वर्षापूर्वी वैजापूर तालुक्यातील आचलगाव येथील तुकाराम निवृत्ती अवचिंदे यांच्यासोबत झाला होता. तुकाराम पत्नीसह बिडकीन येथे खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. याचदरम्यान सुशीला व तुकारामचे सतत खटके उडत होते. २१ मे रोजी रात्री सुशीलाचे वडील बिडकीन येथे आले व दोघांची समजूत काढून निघून गेले. मात्र, २२ मे रोजी पहाटे तुकारामने सुशीलाचा गळा दाबून खून केला.
बातम्या आणखी आहेत...