आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात चाकूने पत्नीचा खून करून पती ठाण्यात हजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शहरातील मराठा बिल्डिंगसमोरील चरवईपुरा भागात राहत्या घरात पतीने धारदार चाकूने पत्नीचा खून केला. रविवारी पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान ही घटना घडली. दरम्यान, सकाळी ६.३० वाजता खून करणारा निर्दयी पती स्वत: सदर बाजार पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून खुनाचा गुन्हा नोंदवला.

पूजा अशोक सुरा (२५) असे मृत विवाहितेचे नाव असून पती अशोक (३८) याने तिचा खून केला. यात पत्नी पूजा माझे ऐकत नाही, नेहमी भांडण करते, माझ्यावर हात उचलते. त्यामुळे खून केल्याचे अशोकने पोलिस ठाण्यात येऊन सांगितले. ठाणे अंमलदार हरणे यांनी ही माहिती पीएसआय परदेशी यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परदेशी यांनी अशोकला ताब्यात घेऊन प्राथमिक विचारपूस केली व त्याला घटनास्थळी नेले.

दरम्यान, १० बाय १० फूट आकाराच्या खोलीत पूजाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तिच्या मानेवर मागच्या बाजूला, हनुवटीवर, गाल व गळ्याच्या उजव्या बाजूला खोलवर जखमा होत्या. गादीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त होते. मृत पूजाची मुलगी सोनाक्षी (५) हीने सकाळी आजीला झोपेतून उठवून ही घटना सांगितल्यावर कुटुंबीयांना हा प्रकार समजला, असे नातेवाइकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...