आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला दिले होते पेटवून, पतीस जन्मठेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड -चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळणाऱ्या पतीस येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. बी. अग्रवाल यांनी दोषी ठरवत बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विवाहितेचा मृत्युपूर्व जबाब व मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव भगवान केदार असे आहे.
शिरूर तालुक्यातील वारणी येथील भगवान केदार (४२) हा पत्नी मीराबाई (३२) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिला भांडत होता. ६ डिसेंबर २०१२ रोजी सकाळी आठ वाजता दोघांत भांडणे झाली. यात भगवानने मीराच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात मीरा गंंभीर भाजल्याने तिला बीडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

रुग्णालयात नायब तहसीलदार अभय मस्के व पोलिस खंदारे यांनी तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवला. उपचारादरम्यान १३ डिसेंबर २०१२ रोजी विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात आले. असता न्यायाधीशांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील एन. एन. साबळे यांनी काम पाहिले.

मुलीची साक्ष महत्त्वाची
मीराबाई केदार हिच्या मृत्यू प्रकरणात तिची मुलगी अनिता केदार (२१) हिने बुधवारी सकाळी महत्त्वाची साक्ष दिली. चारित्र्याच्या संशयावरून वडील आईला त्रास देत होते. त्यांनीच तिला पेटवले, असे तिने कोर्टासमोर सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली, अशी माहिती सरकारी वकील एन. एन. साबळे यांनी दिली.

प्राचार्यांची साक्ष खोटी
या प्रकरणातील आरोपी भगवान केदार याच्या बचावासाठी शिरूर येथील कालिका विद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्यांचीही साक्ष झाली. त्यांनी न्यायालयात साक्ष देताना जेव्हा ही घटना घडली, तेव्हा अनिता ही सकाळी आमच्या शाळेतच होती, असे सांगितले. मात्र, आरोपीच्या बचावासाठी प्राचार्यांनी दिलेली साक्ष खोटी ठरली.