आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच रचला कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- तालुक्यातील मौ.उखळद येथील एका महिलेने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा निर्घृण खून केला. मंगळवारी मध्यरात्री ही  घटना घडली.   
उखळद येथील कैलास मल्हारी वाघमारे (३८) याने ताडकळस पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री फिर्याद दाखल केली.   मनोहर कोंडिबा वाघमारे याचे आश्रुबा वाघमारे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या संबंधांत आश्रुबा वाघमारे हे अडथळा ठरत असल्याचे ओळखून पत्नीने प्रियकर मनोहर वाघमारे याच्या सहकार्याने खुनाचा कट रचला आणि मंगळवारी रात्री आश्रुबा वाघमारे झोपेत असताना मनोहर याने चाकूचे वार केले. त्यात आश्रुबा जागीच मृत्यू पावले. दरम्यान, या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर रेड्डी, ताडकळस पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश लांडगे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील वाघमारे, पोलिस कर्मचारी टाकरस, निळे, जंगम, कदम व कुलकर्णी यांनी  दोघा आरोपींना ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...