आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर  (जि. जळगाव) - रामेश्वर बुद्रूक येथील ग्रामपंचायतीच्या सेवानिवृत्त शिपायाने गुरुवारी रात्री पत्नीच्या डोक्यात मुसळ मारून तिचा खून केला. त्यानंतर पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान विष घेऊन स्वत:ही आत्महत्या केली.   त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली व मुलगा असा परिवार आहे. 

रघुनाथ गंभीर पाटील (वय ६६) आणि त्यांची पत्नी अरुणाबाई रघुनाथ पाटील (वय ६०) हे दोघे घरी होते. त्यांचा मुलगा लग्नासाठी बाहेर गावी गेला होता. रघुनाथ यांनी त्यांची पत्नी अरुणाबाई हिच्या डोक्यात मुसळीने मारून तिला जागीच ठार केले. त्यामुळे घरात रक्ताचे थारोळे साचले. हे रक्त त्याने कपडा व रद्दी पेपरने पुसून प्लास्टिक पिशवीत भरून ठेवले. तसेच अरुणाबाई हिला उचलून खाटेवर झोपवले. त्यानंतर स्वतः विषारी औषध घेऊन घरात झोपून राहिले. शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत कोणीच न उठल्यामुळे शेजारच्यांनी घरात पाहिले असता  हा प्रकार लक्षात आला.
 
बातम्या आणखी आहेत...