आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 हजार तलाव पुनरुज्जीवित करणार, लातुरात मुख्यमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात येणारे पाण्याचे काम हे राष्ट्रीय काम आहे. ती संधी आपल्याला मिळाली आहे, असे समजून हे काम करावे. पाणी तेथे समृद्धी. त्यासाठीच तीन वर्षांत राज्यातील ४० हजार तलाव पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
लातूर जिल्ह्यात सरकारच्या प्राधान्यक्रमावरील (फ्लॅगशिप) योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी बुधवारी घेतला.  या वेळी योजना उत्कृष्टरीत्या राबवल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यापुढील योजनांतही अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

जमिनीवर बसून एेकले कीर्तन
खरोसा (ता. निलंगा) येथे सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी रात्री १० वाजता जमिनीवर बसून कीर्तन ऐकले. हे कीर्तन जलप्रबोधनपर होते.
बातम्या आणखी आहेत...