आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवाना लाल, अंबर दिव्यांचा वापर करणार्‍यांवर कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालय व सरकारी आस्थापनांमधील काही अधिकारी परवानगी नसतानाही लाल वा अंबर दिवा आपल्या गाडीवर लावतात. अशा अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे.

मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील विभागीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये, महामंडळ, मंडळ आणि प्राधिकरण या कार्यालयातील जे अधिकारी लाल/अंबर दिवा परवानगी नसतानाही वापर करीत असतील त्यांनी तातडीने असे दिवे काढावेत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून पात्र नसतानाही लाल व अंबर दिव्याचा वापर अधिकारी करीत असल्याचे आढळल्यास पोलिस अधिकारी वा परिवहन अधिकार्‍यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना त्वरित कळवावे, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या सूचनांचे उल्लंघन करणार्‍या अधिकार्‍यांवर विभागीय कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.