आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाची अश्लिल क्लिप तयार करून ब्लॅकमेल करणारी तरुणी जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - फोनवरून झालेल्या ओळखीतून शिक्षकाला आपल्या जाळयात ओढून त्याच्यासोबत क्लिप काढून एक कोटीची खंडणी मागणाऱ्या ब्लॅकमेलर औरंगाबाद येथील तरुणीला पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी बसस्थानकातून अटक केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

शहरातील एका शिक्षकाचे औरंगाबादेत शिक्षण घेणाऱ्या बुलडाण्याच्या एका तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत तरुणीने शिक्षकाला जाळ्यात ओढले. त्याला औरंगाबादमधील आपल्या रूमवर बोलावून घेत त्याच्याशी संबंधाची क्लिप बनवली. यानंतर महिनाभरापासून ही तरुणी शिक्षकाला एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्यासोबतची क्लिप सार्वजनिक करेल, अशी धमकी देत खंडणी मागत होती. तडजोडीअंती ५० लाख रुपयांमध्ये हे प्रकरण मिटवण्याचे ठरले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, बीडमध्ये पकडले