आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकाराने जमीन हडपली, महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- सावकाराने जमीन हडपल्याचा कारणावरून आणि डीडीआर कार्यालय सावकाराच्या विरोधातील प्रकरण चालवत नसल्याचा आरोप करून सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील महिला शेतकऱ्याने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजता घडली. 

  
कौशल्याबाई नामदेव उबाळे असे महिलेचे नाव असून गावातील सावकारांनी तिच्या आज्ञानाचा फायदा घेऊन ३ गुंठे ३१ आर जमीन हडप केल्याचा आरोप केला आहे. सदर महिला शेतकऱ्याने गट क्र. २४० मधील सदर जमीन गावातील लक्ष्मीबाई कुंडलिक शिंदे यांच्याकडून विकत घेतली होती. नंतरच्या काळात घरगुती खर्चासाठी गावातील लक्ष्मीबाई शिंदे, श्रीधर शिंदे, लक्ष्मण दरोगे सावकारांकडून कौशल्याबाई उबाळे यांनी काही रक्कम घेतली. या रकमेपोटी या लोकांनी सर्व जमीन हडप केल्याचा आरोप सदर महिला शेतकऱ्याने केला आहे. या जमिनीचे प्रकरण सेनगाव येथील निबंधक कार्यालयात सावकारी अधिनियमाखाली चालू होते. परंतु निकाल विरोधात गेल्याने कौशल्याबाई उबाळे यांनी येथील डीडीआर कार्यालयात अपील दाखल केले. 


अपील दाखल होऊन १० महिने झाले तरी एकही तारीख न झाल्याने, आणि तिकडे सावकारांनी जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याने महिला शेतकऱ्याने ८ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी सदर महिला जिल्हाधिकारी कार्यालयासामोर रॉकेलची बॉटल काढून अंगावर घेतली. मात्र पोलिसांनी तिच्या हातातील आगगाडी हिसकावून घेतली आणि अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...