आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबडमध्ये बारवेत पडून महिलेचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड - पाय-यावरील शेवाळावरून पाय घसरून पडल्याने शहरातील पुरातन कावंदी बारवेत मंगळवारी महिलेचा बुडून मृत्यू झाला. सोनाली ऊर्फ ज्योती संतोष सराटे (25, माळी गल्ली) असे महिलेचे नाव आहे. शहरात आठ दिवसांआड नळाला पाणी येत आहे. सोनाली दुपारी 3 वाजता 6 महिन्यांची मुलगी राजश्री हिला शेजारी ठेवून पाण्यासाठी गेली होती.

1750 मधील बारव
कावंदी बारव पुरातन आहे. अहिल्याबाई होळकरांनी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अशा सहा बारवांची 1750 मध्ये निर्मिती केली होती. 70 फूट खोल बारवेत सध्या 35 फुटांवर पाणी आहे, स्वच्छतेअभावी दुर्गंधी वाढतच चालली आहे. बारवेतील दूषित पाणी सांडपाण्यासाठी वापरले जाते.
सभागृहात चर्चा करू
शहरातील पाण्यासाठी बळी गेल्याची ही पहिलीच घटना असावी. महिलेच्या कुटुंबीयांना मदतीसाठी सभागृहात चर्चा करू.मंगल कटारे, नगराध्यक्ष, अंबड