आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Doctor With Nurse Assaulted In Jalna; Crime Registered Against Doctor

जालन्यात महिला डॉक्टरसह नर्सचा विनयभंग; डॉक्टरवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - परिचारिका आणि डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रकाश संभाजी उजगरे असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता सामान्य रुग्णालयात हा प्रकार घडला.
याप्रकरणी परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कुणीतरी अश्लील चिठ्ठी आणून टाकली होती. चिठ्ठी कोणी टाकली हे डॉ. प्रकाश उजगरे यांना विचारले. त्यावर डॉ. उजगरे यांनी परिचारिकेचा विनयभंग केला. अश्लील वर्तनामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. हे बघून मध्यस्थी करणार्‍या महिला डॉक्टरचाही विनयभंग केल्याचे परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भंडरे करत आहेत. रुग्णालयात सुरू असलेल्या या गोंधळामुळे रुग्णांना त्रास झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.