आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा-सुविधा कागदावरच, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूत महिलेला 2 दिवस ठेवले उपाशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाडगाव येथे प्रसूत झालेल्या महिलेची चौकशी करताना आरोग्य देखरेख समितीचे पदाधिकारी. - Divya Marathi
लाडगाव येथे प्रसूत झालेल्या महिलेची चौकशी करताना आरोग्य देखरेख समितीचे पदाधिकारी.
वैजापूर - लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या महिलेला दोन दिवसांपासून आरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभारामुळे उपाशीपोटी राहण्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा आरोग्य देखरेख समितीच्या सदस्यांनी केलेल्या अचानक तपासणी मोहिमेत उघडकीस आला.
 
विशेषत: आरोग्य विभागाकडून महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आरोग्य विभाग जनजागृतीच्या माध्यमातून मोठा गाजावाजा करते. मात्र प्रत्यक्षात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांना आरोग्य केंद्रातील यंत्रणा मनमानी पद्धतीने वेठीस धरत असल्यामुळे आरोग्य सेवासुविधा केवळ कागदावर रुग्णाला पुरविल्या जात असल्याचे बिंग आरोग्य समितीने फोडले.  
 
जिल्हा आरोग्य देखरेख समितीचे सदस्य व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी  लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली होती.त्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. म्हस्की येथील राणी आकाश दातीर या महिलेची दोन दिवसांपूर्वीच प्रसूती झाली. समितीच्या सदस्यांनी महिलेला आरोग्य केंद्राकडून कोणकोणत्या सुविधा मिळाल्या यांची विचारपूस केली असता महिला रुग्णाने दोन दिवसापासून जेवण मिळाले नसल्याचे स्पष्ट केले. वास्तविक रुग्ण कल्याण निधीतून रुग्णांना जेवण द्यावे, यासाठी आर्थिक तरतूद असतानाही आरोग्य केंद्राने रुग्णांना जेवण देण्यासाठी अनास्था दाखविल्याचे निष्पन्न झाले. तपासणी समितीच्या सदस्याने याप्रश्नी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा बंद फाेन होता. सदस्यांनी दोन तास अधिकाऱ्याची वाट पाहून ते आरोग्य केंद्राकडे फिरकले नाही. या वेळी समिती सदस्यांनी शस्त्रक्रिया विभागाच्या तेथे अनेक त्रुटी समोर आल्या.  
 
रुग्ण कल्याण खर्चाचा तपशील लावला...  
रुग्ण कल्याण निधी खर्चाचे सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी गेलेल्या  सदस्य धोंडिरामसिंह राजपूत, समन्वयक अन्नपूर्णा ढोरे व अर्जुन जगताप यांनी लिपिकाकडे कॅश बुक व जमा खर्च रजिस्टरची मागणी केली. लिपिकाने ते रजिस्टर वैद्यकीय अधिकारी यांच्या कपाटात असल्याचे सांगून रुग्ण कल्याण निधी खर्चाचे तपशील तपासणीसाठी सादर केला नाही. त्यामुळे डॉ. डी. पी. घोलप, आरके, मुरलीधर वर्मा, प्रशांत देशपांडे व कविता बंछोड यांचा हिरमोड झाला.
बातम्या आणखी आहेत...