आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्‍यात विज पडून महिला गंभीर जखमी, भोकरदन तालुक्‍यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजेमुळे पुष्‍पाबाई बावस्‍कर (वय ४५) यांचे संपूर्ण शरीर भाजले. - Divya Marathi
विजेमुळे पुष्‍पाबाई बावस्‍कर (वय ४५) यांचे संपूर्ण शरीर भाजले.
सोयगाव देव - रविवारी भोकरदन तालुक्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामध्ये देहड परिसरातील पुष्पाबाई शिवाजी बावस्कर (वय ४५) या महिलेच्या अंगावर विज पडून त्‍या गंभीर जखमी झाल्या आहेत.
 
रविवारी सायंकाळी भोकरदन तालुक्यातील दानापुर, पिंपळगाव रेणुकाई, मव्हारा,सोयगाव देवी, देहडसह  अनेक भागात विजा, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. देहड येथे पुष्पाबाई शिवाजी बावस्कर या राञी 8 च्या दरम्यान घरात स्वयंपाक करत असताना त्‍यांच्‍या घरासमोरील लिंबाच्‍या झाडावर विज कोसळली. यामुळे लिंबाचे झाड पुर्ण चिरले तसेच पुष्पाबाईही गंभीर जखमी झाल्या. विजेमुळे त्यांचे पुर्ण शरीर भाजले.
 
त्‍यांच्‍यावर सध्‍या भोकरदन येथील ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तलाठी पी.एम.वाघ यांनी घटनेचा पंचनामा केला असून पंचनाम्‍याची प्रत तहसिलदार वाघमारे यांना देण्यात आली आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...