आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू विक्री बंदसाठी पोलिस स्टेशनवर मोर्चा, जामगावात महिलांचा एल्‍गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - जामगाव येथील नागरी वसाहतीमध्ये असलेल्या वैध अवैध दारू दुकानात येणाऱ्या तळीरामांमुळे नागरिक महिला त्रस्त झाल्या असून अनेकदा सूचना, विनंत्या करूनही फरक पडत नसल्याने महिलांनी रौद्र रूप धारण करून वैध अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर गंगापूर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढल्याने दोन्ही दुकानदार दुकाने बंद करून फरार झाले. दारू कायमची बंद करावीत, अशी मागणी महिलांनी केली आहे.
 
एक एप्रिलपासून गंगापूर शहरासह तालुक्यातील बहुतांश दारू दुकाने बंद झाले असून जामगाव येथील दुकान मात्र सुरू होते. त्यामुळे तालुक्यातील शेकडो तळीराम जामगाव येथे दररोज येत असल्याने त्यांच्या त्रासाने नागरिक महिला त्रस्त झाल्या आहेत. ग्रामपंचायतीने मे रोजी ठराव घेऊन गावात दारूबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही दारूड्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे महिलांनी एकजूट करून निर्णायक लढा उभारण्याचा निर्णय घेऊन २१ मे रोजी वैध अवैध दुकानांसमोर हल्लाबोल करून दारू विक्री बंद पाडली त्यानंतर मोर्चा गंगापूर पोलिस स्टेशनवर नेऊन दारू पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले.
 
दारूबंदी झाल्यास ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदनावर विजया देवकर, रेणुका ठोंबरे, लक्ष्मीबाई देवकर, ज्योती दरेकर, नंदाताई ठोबंरे, गंगूबाई काळे, संगीता आढाव, सुनीता सोनवणे, संगीता मगर, मीना साबळे, कमलबाई तुपलोंढे, चंदा साबळे, शकुंतला जाधव, सोनाली पंडित, राधाबाई थोरात, संगीता पारखे आदींसह महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...