आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत पडलेल्या महिलेला वाचवण्‍यात यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जालना - विहिरीत पाणी आहे का हे पाहण्यासाठी गेलेली महिला तोल घसरून विहिरीत पडली. त्यानंतर नातेवाइकांनी मदतीसाठी आरडाओरड केली, तेव्हा एका युवकाने दाखवलेले धाडस आणि त्याला नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे 50 फूट विहिरीत पडलेल्या विवाहितेला वाचवण्यात यश आले.

या विवाहितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेख शाहीन शेख इब्राहिम (30, कन्नड, जि. औरंगाबाद) ही विवाहिता सोमवारी कन्नडहून जालना येथे माहेरी आली होती. शाहीन यांचे वडील शेख अब्दुल शेख रझ्झाक (इन्कमटॅक्स कॉलनी, घायाळनगर, जालना) यांच्या घरासमोरच एक विहीर आहे. त्यामुळे शेख शाहीन त्या विहिरीत पाणी आहे का हे पाहण्यासाठी विहिरीजवळ गेल्या तेव्हा त्यांचा तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. सागर गुंटूक या युवकाने विहिरीत उतरून दोरीच्या साहाय्याने विवाहितेस सुखरूप बाहेर काढले.