नांदेड- पुण्यात आईने पोटच्या मुलीला नदीत फेकून दिल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्येही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात महिलेने दोन महिन्यांच्या चिमुकलीला नाल्यात फेकले आणि तेथून ती पसार झाली. देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात ही घडली आहे.
दैव बलवत्तर म्हणून वाचली चिमुकली... महिलेल्या नाल्यात काही तरी फेकल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यांना रडण्याचा आवाज आला. लोकांना तत्काळ तिला नाल्यातून बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दैव बलवत्तर म्हणून चिमुकली बचावली. महिलेचा पोलिस शोध घेत आहेत. ती महिला कोण? तिने कशासाठी चिमुकलीला फेकले असावे? याची सध्या पोलिस चौकशी करत आहे.
पुढील स्लाइडवर वाचा... बाळाच्या अपहरणाचा ढोंग करणार्या आईच 10 दिवसांच्या मुलीला फेकले नदीत...