आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणी खुर्द - वैजापूर तालुक्यातील वाकला येथील ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी आणि गावात नव्याने स्वच्छतागृह उभारण्यात यावे, या मागण्यांसाठी बुधवारी (3 जुलै) सकाळी हंडा मोर्चा काढला. या मोर्चात गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी महिलांनी सरपंचांना घेराव घालत निवेदन दिले. याप्रसंगी सरपंचांनी गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले. त्यानंतर मोर्चा विसजिर्त करण्यात आला.

वाकला या गावाची लोकसंख्या किमान दहा ते बारा हजारांच्या आसपास आहे. या गावाचा आता मोठय़ा प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यामुळे या गावात महिलांसाठी बांधण्यात आलेले स्वच्छतागृह अपुरे पडत आहे. त्यासाठी गावात ग्रामपंचायतीने पुन्हा नव्याने स्वच्छतागृह बांधावे. ज्या ठिकाणी स्वच्छतागृह आहेत त्या ठिकाणी पाणीच नसल्याचे त्याचा वापर होत नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीने पाणी उपलब्ध करून द्यावे. गावात मागील आठ दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. त्यासाठी गावातील पाणीपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन सरपंच कुसुमबाई सोनवणे व उपसरपंच अशोक सोनवणे यांना ग्रामस्थांनी दिले. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त होता.

नवीन पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव दिला असून पाइपलाइन दुरुस्तीचादेखील प्रस्ताव दिला आहे. एक विहीर अधिग्रहण केली असून लवकरच दुसरी विहीरही अधिग्रहित करण्यात येणार आहे. कुसुमबाई सोनवणे, सरपंच