आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचे चक्क नाक कापले; परळी तालुक्यातील खळबळजनक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील माळशेत शिवारात रस्त्याने जात असलेल्या महिलेला गाठून मारहाण करत तिचे नाक कापल्याची खळबळ जनक घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. रात्री उशिरापर्यंत परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

अंबाजोगाई तालुक्यातील घाटपिंप्री येथील रहिवासी असलेली तीसवर्षीय महिला परळी धर्मापुरी येथील माळशेत शिवारात दुपारी तीन वाजता रस्त्याने पायी जात होती. त्याच वेळी तिला गाठून मारहाण करत तिचे नाक कापण्यात आले.

या घटनेनंतर महिलेस अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. महिलेचे नाक कोणत्या कारणाने कापण्यात आले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री उशिरा रुग्णालयात महिलेचा जवाब नोंदवण्याची आणि परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...