आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये मतदान करण्यात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - दहावी, बारावीसह विविध परीक्षांच्या गुणवत्ता यादीत कायम मुलांपेक्षा मुलीच्या गुणवत्तेचे प्रमाण अधिक असल्याचे अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे. त्याच धर्तीवर लातूर जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी असतानाही महिलांनी जास्त टक्केवारीने मतदान केले आहे. महिला मतदारांचे पुरुषांपेक्षा ०.२९ टक्क्याने अधिक मतदान झाले आहे.  

लातूर जिल्ह्यात एकूण १३ लाख ६ हजार २२९ इतके मतदार असून त्यातील पुरुष मतदार ६ लाख 
९८ हजार ८७१, तर स्त्री मतदार ६ लाख ७ हजार ३५४ व इतर मतदार चार आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील ८ लाख ४५ हजार १८५ मतदारांनी १ हजार ४९१ मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केले. त्यामध्ये पुरुषांची संख्या ४ लाख ५१ हजार २५० इतकी असून स्त्री मतदाराची संख्या ३ लाख ९३ हजार ९३५ इतकी आहे. 

दरम्यान,  औसा तालुक्यात सर्वात जास्त म्हणजेच ६७.३७ टक्के मतदान झाले असून देवणी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ६०.८३ टक्के मतदान झाले आहे. सर्व मतदान यंत्रे व्यवस्थितपणे आणून त्या त्या तालुक्याच्या मुख्यालयी स्ट्राँग रूममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. येत्या गुरुवारी दहा तालुक्यांच्या मुख्यालयी मतमोजणी होणार आहे.  
 
तालुकानिहाय मतदान  
लातूर     ६४.०७ टक्के  
रेणापूर     ६६.२६ टक्के  
औसा     ६७.३७ टक्के  
उदगीर     ६४.४० टक्के  
अहमदपूर     ६६.५९  टक्के 
चाकूर     ६४.२२ टक्के  
जळकोट     ६४.४० टक्के  
निलंगा     ६२.५३ टक्के  
देवणी     ६०.८३ टक्के  
शिरूर अनंतपाळ ६५.७७ %
बातम्या आणखी आहेत...