आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न; केज तालुक्यात कौटुंबिक वादातून घेतला निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- कौटुंबिक वादातून घरातून निघून गेलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पत्नीने दोन मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज तालुक्यातील होळ गावात सोमवारी घडली. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तिघांवर उपचार सुरू असतांना अप्सरा घुगे या मुलीचा मृत्यू झाला. 

पांडुरंग घुगे (२५) या तरुणाचा पाच वर्षांपूर्वी इंदूबरोबर विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना  पवन व अप्सरा ही दोन अपत्ये  झाली. दोन दिवसांपूर्वी  पांडुरंग व इंदू या दोघांत  वाद झाला. रागाच्या भरात पांडुरंग घुगे हा घरातून निघून गेला होता. सोमवारी सकाळी चंदनसावरगावजवळील पेट्रोल पंपाच्या मागे काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पाण्याच्या बाटल्या, कीटकनाशकाची बाटली व दुचाकी (एमएच १२ बीएच ८४६४) आढळून आली आहे. 

घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे जमादार राजेंद्र वाघमारे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, पांडुरंगने आत्महत्या केल्याची माहिती होळ येथे कळताच पत्नी इंदूबाई घुगे (२२) हिने स्वतः विष  घेऊन मुलगा पवन (अडीच वर्ष) व अप्सरा (सहा महिने) यांनाही  विष पाजले. हा प्रकार कळताच ग्रामस्थांनी मायलेकरांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. पवन घुगे व त्याची सहा महिन्यांची बहीण अप्सरा या दोघांची प्रकृती चिंताजनक असून इंदूबाई यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे अंबाजोगाई येथील डॉक्टरांनी सांगितले.  

शेतीबरोबर रसवंतीचा व्यवसाय  
होळ येथील पांडुरंग घुगे हा शेतीसह रसवंतीचा व्यवसाय करत होता. त्याने काही महिन्यांपूर्वीच गावात रसवंती सुरू केली होती. पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार असताना पती - पत्नीतील किरकोळ वादातून पांडुरंग याने टोकाचे पाऊल उचलले.
बातम्या आणखी आहेत...