आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Commit Suicide After Killing Her 3 Childrens By Poison

क्षुल्लक कारणावरून तीन मुलांना विष पाजून आईने घेतला गळफास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांची आई शेख नूरजहाँ (पिवळ्या ड्रेसमध्ये), मुलगी शेख नेहा, आणि मुलगी शेख तोहीद - Divya Marathi
मुलांची आई शेख नूरजहाँ (पिवळ्या ड्रेसमध्ये), मुलगी शेख नेहा, आणि मुलगी शेख तोहीद
अंबाजोगाई - तीन मुलांना विष पाजून माजी सैनिकाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अंबाजोगाई शहरातील मियाभाई कॉलनीत घडली. नातेवाइकाच्या लग्नाला कोणी जायचे हे या घटनेचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. तिन्ही मुलांवर सुरुवातीला विषप्रयोग करून त्यांचा गळा ओढणी किंवा साडीने आवळून खून केल्याचा अहवाल डॉक्टारांनी दिला आहे. शेख नूरजहाँ शेख फतरू (३८), शेख नेहा शेख फतरू (१४), शेख तोहीद शेख फतरू (९), शेख अफान शेख फतरू(४) असे मृतांची नावे आहेत.

भारतीय लष्करातून मेजर म्हणून सेवानिवृत्त झालेले शेख फतरू शेख रज्जाक (मूळ रा.जवळगाव, ता.अंबाजोगाई) हे पत्नी व तीन मुलांसह शहरातील मियाभाई काॅलनीमध्ये राहत होते. परळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून ते नोकरीस आहेत. शुक्रवारी रात्रीची ड्यूटी असल्याने ते सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. रात्री ड्यूटी करून ते सकाळी ८.३० वाजता घरी परतले. घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी पत्नी व मुलांच्या नावाने आवाज दिला. परंतु घरातून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारील खोलीच्या खिडकीचे काच फोडून आत डोकावले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत पत्नी नूरजहाँ दिसून आली. हे दृश्य पाहून शेख यांनी शेजाऱ्यांना हा प्रकार सांगून पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह हलवले.

एकाच पलंगावर मुले
बैठकीच्या खोलीतील एकाच पलंगावर मुलगी नेहा, मुलगा तोहीद, अफान ही तिन्ही मुले मृतावस्थेत आढळली. मुलांच्या अंगावरील ब्लँकेट काढून पाहिले असता त्यांना विष पाजल्याची बाब समोर आली. आतील खोलीत पत्नी शेख नूरजहाँने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

सर्व बाजूंनी तपास
तिन्ही मुलांची हत्या आईने केली की इतर कुणी केली, हे पोलिस तपासानंतरच निष्पन्न होईल. घराचे दरवाजे आतून बंद असल्यामुळे या हत्येचा संशय सध्या आईवर आहे. अन्य बाजूंनीही पोलिस तपास करत आहेत.

परळीत अंत्यसंस्कार
शेख नूरजहाँचे माहेर परळी असल्यामुळे तिच्या माहेरील लोकांनी अंबाजोगाई येथे धाव घेऊन तिचा पती शेख फतरू शेख रज्जाकविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली. शेख नूरजहाँसह तिच्या तीन मुलांवर परळी येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली.

काय सांगतो शवविच्छेदन अहवाल
अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयात तिन्ही मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले. मुलांना रात्री ८ ते ९ च्या दरम्यान विष पाजून त्यांना पलंगावर झोपवण्यात आले. यानंतर गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तर नूरजहाँने रात्री १२ वाजेच्या सुमारास गळफास घेतला असावा, असा अहवाल डॉ. विश्वजित पवार यांनी दिला.