आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Dead For Poisioning At Bidkin News In Marathi

माठातील पाणी प्यायल्याने विषबाधा; महिलेचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन- शेतात अनेक दिवसांपासून पडलेल्या जुन्या माठातील पाणी प्यायल्याने पाच महिलांना विषबाधा झाल्याची घटना बिडकीन परिसरात शुक्रवारी घडली. यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर महिला अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिडकीन येथील भीमा भालेकर यांच्या शेतामध्ये कांदे कापण्यासाठी बंगला तांडा येथील पार्वताबाई राठोड(65) कमळाबाई आडे(63) कौराबाई राठोड(45) कलाबाई राठोड(40) सोनू राठोड(30) या गेल्या होत्या. काम करत असताना शेतात बर्‍याच दिवसांपूर्वी पडलेला माठ त्यांना सापडला. त्यांनी तो धुतला व त्यात पाणी साठवले. दुपारी जेवणानंतर हे पाणी प्यायल्यानंतर सर्वच महिलांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. काही वेळानंतर महिला अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान, पार्वताबाई राठोड यांचा मृत्यू झाला. तर कमलाबाई आडे या गंभीर असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कौराबाई राठोड व कलाबाई राठोड या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर सोनू राठोड या महिलेवर बिडकीन येथे उपचार सुरू आहे.