आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले लग्न लपवून पाच लाखांची फसवणूक; डॉक्टर महिलेसह 14 जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- येथील एका डॉक्टर महिलेने पहिले लग्न लपवून लग्नाच्या अवघ्या नऊ महिन्यांतच पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद लातूर येथील पतीने दिल्यावरून लातूरच्या गांधी चौक पोलिस ठाण्यात डॉक्टर महिलेसह तिच्या माहेरच्या १४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

लातूर येथील व्यापारी शहाजान खान पठाण यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा विवाह परभणी येथील दर्गा रोडवरील गालीबनगरातील महेमूदखान छटूखान पठाण यांची द्वितीय कन्या डॉ. मेहराज हिच्याशी २४ जुलै २०१५ रोजी झाला होता. लग्नानंतर दोन ते तीन महिने डॉ.मेहराज ही सासरी चांगली राहिली. परंतु त्यानंतर घरात विनाकारण भांडण सुरू झाले. दवाखान्याचे साहित्य आणण्याच्या नावावर पतीकडून दोन लाख रुपये तिने घेतले. मात्र, ते साहित्य परभणीत माहेरच्या पत्त्यावर पाठविले. डॉ.मेहराज हिने माहेरी जाताना लग्नातील १० तोळ्याचे सोन्याचे दागिनेही नेले. याप्रकरणी पत्नी डॉ.महेराज हिच्यासह महेमूद खान पठाण, खदिरा पठाण, समीर पठाण, सना फातेमा पठाण, असीर पठाण (सर्व रा.परभणी), मुनीरा शेख (रा.पाथरी), जावेद सय्यद, कनिस फातेमा सय्यद, हमीद सय्यद, खालेद सय्यद (रा.परळी), डॉ.महेनाज रोशन कोल्हे, डॉ.रोशन कोल्हे (रा.मुलुंड), आलिया तरन्नुम (हिंगोली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...