आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना जिल्ह्यात 7 महिलांचा बुडून मृत्यू; 4 वेगवेगळ्या घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जालना जिल्ह्यात रविवारी ४ वेगवेगळ्या घटनांत ७ महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पहिल्या घटनेत बदनापूर तालुक्यात कस्तुरवाडी गावातील नदीवर ४ मुली रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. एक मुलगी पाण्यात पडल्यानंतर तिला वाचविण्यासाठी दुसरीने हात पकडला. दोघीही पाण्यात बुडू लागल्याचे बघताच तिसऱ्या मुलीने त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. पण तीही पाण्यात पडली. चौथ्या मुलीनेही तिघींना ओढण्याचा प्रयत्न केला, हात निसटल्यामुळे ती बचावली. यात सायमा जुम्मेखाँ पठाण (१४), गजाला शेख मोईन (१७), राणी शेख मोईन (१३) मृत, तर सीमा शब्बीरखॉ पठाण ही बचावली.

दुसरी घटना : पाणी शेंदताना बुडाली
बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील शिवारातील एका विहिरीवर देवूबाई मुळक (६०) या गेल्या होत्या. दरम्यान, पाणी शेंदत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला.

तिसरी घटना : विहिरीत घसरून मृत्यू
अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे सकाळी ८ वाजता पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून रमलबाई सुदाम टिकारे (७०) यांचा मृत्यू झाला. त्या प्रात:विधीसाठी जात असताना ही घटना घडली.

चौथी घटना : माकड मागे लागल्याने पळताना २ बहिणी विहिरीत पडल्या
परतूर- माकड मागे लागले म्हणून घाबरून पळत असताना तोल जाऊन बाजूच्या विहिरीत पडल्याने दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना परतूर तालुक्यातील वाई येथे २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. साक्षी केशव गायकवाड (९), मीनाक्षी केशव गायकवाड (६) अशी मृत मुलींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बातम्या आणखी आहेत...