आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमातून औरंगाबाद येथील विवाहीतेचा जालन्यात पतीसमोरच चिरला गळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - एकतर्फी प्रेमप्रकरणातून औरंगाबाद येथील महिलेची जालन्यात गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. कल्पना रवी खिल्लारे असे मृत महिलेचे नाव असून ती औरंगाबादच्या सातारा परिसरातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे ती पतीसोबत चारचाकी गाडीतून प्रवास करीत असताना आरोपीने त्यांची गाडी थांबवून तिची हत्या केली. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित मारेकऱ्यास अटक केली आहे. 
 
याप्रकरणी मृत कल्पना यांचे पती रवी खिल्लारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  या तक्रारीनुसार बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ते इंडिका (एम.एच.२० सी.एच.६४५०) मधून जात असताना आरोपी सचिन सुभाष सुपारकर(कुच्चर ओटा,जुना जालना) याने जालना शहरातील मोतीबागेजवळ त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना यांना बाजूला नेऊन “माझे तुझ्यावर प्रेम होते, तू त्याच्यासोबत लग्न का केले’ असे म्हणत तीक्ष्ण हत्याराने कल्पना यांचा गळा चिरला. त्यामुळे त्या जागेवरच कोसळल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे पती रवी यांनी तातडीने कदीम जालना पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कल्पना यांना जिल्हा रुगणालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी पहाटे ३.३० वाजता पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पहाटे ५ वाजेच्या सुमारास संशयित मारेकरी सचिन सुपारकर यास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी सांगितले. 
 दोघांचेही दुसरे लग्न 
मृत कल्पना यांचा पहिल्या पतीशी वाद झाल्यानंतर त्या वेगळ्या राहत होत्या. तर रवी खिल्लारे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने दोन महिन्यांपूर्वी त्यांचा कल्पना यांच्याशी विवाह झाला होता. गुुरुवारी कल्पनाच्या मामाच्या मुलीचे लग्न असल्याने हे दोघेही जालन्यात आले होते. त्यांनी बुधवारी खरेदी केल्यानंतर ते मोतीबाग परिसरातून इंदिरानगर येथील कल्पनाच्या वडिलांच्या घरी जात असताना हा प्रकार घडला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो
बातम्या आणखी आहेत...