आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोजेगाव खून प्रकरण; महिलेचे दोघांसोबत अनैतिक संबंध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील खून प्रकरणातील आरोपी महिलेचे दोघांसोबत अनैतिक संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्रिकोणी संबंधात पती अडसर ठरल्याने त्याचा काटा काढण्यात आला असल्याची माहिती औंढा पोलिसांनी अटक केलेला तिसरा आरोपी नितीन घुगे (रा. कुरुळा, ता. मालेगाव, जि. वाशीम) याच्या चौकशीतून स्पष्ट झाली आहे.
जालना जिल्ह्यातील अंभोरा (ता. मंठा) येथील विष्णू धोडिंबा डाईफोडे हा सात वर्षांपूर्वी औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे आपल्या सासरवाडीत राहायला आला होता. पती-पत्नी दहा वर्षांच्या मुलीसह गोजेगाव येथे गावठाणामध्ये झोपडीत राहत होते. विष्णूची पत्नी गंगुबाई हिचे किरण ऊर्फ माधव खेमा राठोड (रा. आडगाव तांडा, ता.जिंतूर) याच्यासोबत दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते.
दरम्यानच्या काळात गंगुबाईचे मेहुण्याशीही (बहिणीचे पती) नितीन घुगे (कुरुळा, जि. वाशीम) सूत जुळले. या त्रिकोणात 15 वर्षे संसार केलेल्या पतीचाच खून झाला. पत्नीच्या दोघांसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे घरात रोज भांडणे होत. यामुळे या त्रिकुटाने विष्णूचा काटा काढण्याचे ठरवले व विष्णूवर झोपेत असताना कु-हाडीने वार केले.