आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर तालुक्यातून सैनिकांसाठी महिलांनी पाठवल्या बॉर्डरवर राख्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा - रक्षाबंधनानिमित वैजापूर तालुक्यातून वाघा बॉर्डरवरील जवानांसाठी एक हजार राख्या पाठवण्यात आल्या आहेत.
भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण. अशाच भावांसाठी, जे डोळ्यात तेल घालून अहोरात्र सीमेवर देशाचे रक्षण करतात, त्या भारतीय सैनिकांनारक्षाबंधनानिमित्त शिक्षक भारती संघटनेच्या महिला पदाधिकारी व संपूर्ण तालुक्यातील बहिणींच्या वतीने २० ऑगस्ट रोजी पोस्टाद्वारे एक हजार राख्या पाठवण्यात आल्या. या भावांनी राख्यांचा स्वीकार करावा, देशाचे रक्षण करावे, अशी अपेक्षा या बहिणींनी व्यक्त केली. या वेळी मोठ्या संख्येने महिला व
पुरूष उपस्थित होते.