आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आठ महिन्याच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगाव बु. येथे गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल केला.

शिवहरी कडुबा काकड याच्याशी गेल्या वर्षी मनीषाचा विवाह झाला होता. पती शिवहरी, सासरा कडुबा, सासू रखमा हे पैशासाठी मनिषाचा छळ करत. मात्र, मनीषाच्या वडिलांनी पैशाची जुळवाजुळव होताच पैसे देईल,असे सांगून तिला सासरी आणून सोडले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा मनीषाचा छळ सुरू झाला. दरम्यान, वडील मनीषाला बाळंतपणासाठी माहेरी घेऊन गेले. मनीषाला मुलगा झाल्यानंतर आता तिचा छळ कमी होईल म्हणून पुन्हा तिला सासरी पाठवण्यात आले. परंतु, सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरूच ठेवला.