आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूला विरोध; महिलांना बहिष्कृत ठरवण्याचा घाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - शहरातील वसंतनगर तांड्यावर दारूबंदी करावी, अशी मागणी करणार्‍या महिलांची अडवणूक होत असून त्यांच्या कुटुंबीयांना बहिष्कृत करण्याचा प्रयत्न काही जणांनी चालवला आहे.
दारूला विरोध करणार्‍या महिलांना पाणी भरण्यास मज्जाव करून त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन केले जात असून या महिलांवर पाळत ठेवली जात आहे. या प्रकारांना न जुमानता परिसरातील निरक्षर महिलांनी दारूबंदीचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. परळी शहराजवळच वसंतनगर तांडा आहे. सुमारे दीड हजार लोकवस्ती आहे. परिसरातच दारू मिळत असल्याने शौकिनांची संख्या दररोज वाढत आहे. युवकही दारूच्या आहारी जात आहेत. 3 जुलै रोजी वसंतनगरच्या 70 महिलांनी परळी येथे तहसीलदारांसह ग्रामीण पोलिस ठाण्याला स्वाक्षरीसह निवेदन दिले. काही दिवस दारू बंद झाली. मात्र, ती पुन्हा सुरू झाल्याने महिलांनी हा लढा अधिक तीव्र केला आहे.
उधारीतच संपते ‘उचल’
काही विक्रेते दारूची उधार विक्री करतात. उधारीचा आकडा 15 ते 20 हजार झाला की ही रक्कम तोडीसाठी आलेल्या उचलीतून वसूल केली जाते. परिणामी वर्षभराचा खर्च भागवणे जिकिरीचे होते. कमाईतील निम्मे पैसे दारूवर खर्च होतात. त्यामुळे अनेकांच्या मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. त्यामुळे मजुरांची मुलेही ऊसतोड मजुरीच्या जोखडात अडकत आहेत.