आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यनाथाच्या मूर्तीवरील आवरण महिलांनी काढले, अांदाेलक महिला पाेलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी (जि. बीड) येथील प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीवरील चांदीचे आवरण काढून स्पर्श दर्शन सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात अाहे. यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी वेगळे वळण लागले. पाच महिलांनी पहाटे पाच वाजता दर्शनाच्या निमित्ताने गाभाऱ्यात प्रवेश करून थेट पिंडीवरील चांदीचे आवरण काढून टाकले. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

वैद्यनाथाच्या पिंडींचे स्पर्श दर्शन अनेक वर्षांपासून सुरू होते. २०११ मध्ये मंदिर समितीने स्पर्श दर्शनाने पिंडीची झीज होत असल्याने त्यावर चांदीचे आवरण केले. मात्र हे आवरण काढण्यासाठी चार वर्षांपासून संघटना आंदोलन करत आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजता शांताबाई राठोड, पारुबाई राठाेड, आशाबाई जाधव, कमलबाई नाईकवाडे, तुळसाबाई डोंगरे व अंजनाबाई आवळे या सहा महिलांनी दर्शनरांगेतून गाभाऱ्यात प्रवेश केला. पिंडीजवळ जाताच त्यांनी चांदीचे आवरण काढून टाकून दर्शन घेतले. पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पुन्हा आवरण बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी त्याला विरोध केला. अखेर पोलिसांनी महिलांना गाभाऱ्याबाहेर काढून शिवलिंगावर आवरण बसवले. पहाटे पाच ते सकाळी अकरापर्यंत या महिलांचे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणार असल्याचे शांताबाई राठोड यांनी सांगितले.

न्यायालयीन निर्णय
देवल कमिटीचा निर्णय हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. काही वेळ आवरण काढण्याची मागणी अांदाेलकांनी न्यायालयात करावी. आम्हीही बेल, हळद, कुंकू व दुधाशिवाय पूजेसाठी वेळ देण्याची मागणी करू.
विद्याचरण कडवकर, तहसीलदार तथा अध्यक्ष, देवल कमिटी परळी वैजनाथ

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...