आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला विकास केंद्राकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ऊर्जा, २५ मुलींना घेतले दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - युद्धापेक्षाही जास्त मनुष्यहानी सध्या अपघाताने हाेत अाहे. अपघातामध्ये कुटुंबातील कर्ता व्यक्ती मृत झाला तर त्याचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा वेळी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. नेमकी हीच गरज ओळखून माजलगाव येथील ऊर्जा महिला विकास केंद्र व परिवर्तन समूहाने अपघातग्रस्त कुटुंबातील पाल्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा नवा पायंडा पाडला आहे. आजपर्यंत २५ पाल्यांना या केंद्राने शिक्षणासाठी ऊर्जाच दिली आहे.

माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय अालझेंडे यांनी पत्नी सुशीला आलझेंडे यांना सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी २००३ मध्ये ऊर्जा महिला विकास केंद्राची स्थापना करण्यासाठी प्रवृत्त केले. या केंद्राच्या अध्यक्षपदी अध्यक्ष मालनबाई पवार, तर सचिव म्हणून सुशील अालझेंडे यांची निवड झाली. केंद्राचे काम करत असताना महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होऊन त्यांना कुटुंबाने निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेतले पाहिजे. समाजात विधवा,परित्यक्ता महिलांना सन्मानाने जगता अाले पाहिजे. महिलांसाठी एक चळवळ उभी करत तालुक्यात १२०० बचत गट स्थापन केले. या बचत गटांना उद्याेगासाठी परिवर्तनाच्या माध्यमातून अार्थिक मदत देण्यात येत अाहे. विविध प्रकारच्या शासकीय योजना महिलांनाही कळल्या पाहिजेत यासाठी शिबिर व जनजागृती कार्यक्रमावर भर दिला. चालू वर्षात १ जानेवारी २०१५ पासून या केंद्राच्या माध्यमातून अपघातग्रस्त कुटुंबातील मुलांचे पूर्ण शिक्षण हाेईपर्यंत शैक्षणिक साहित्य व कपडे पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. मागील सहा महिन्यांत २५ कुटुंबांतील पाल्यांना या संस्थेने अाधार दिला आहे. बालकामगारांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था जनजागृती करत अाहे.

सात मुलींच्या नावे एफडी
माजलगाव येथील ऊर्जा महिला विकास केंद्राने जन्मलेल्या सात मुलींच्या नावे परिवर्तन बँकेत प्रत्येकी तीन हजार रुपयांची एफडी केली आहे. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढावचा नारा दिला आहे.

प्रोत्साहनामुळे ऊर्जा
आम्हाला मिळत असलेले प्रोत्साहन व पाठबळामुळे आम्ही संस्था उत्कृष्टपणे चालवत आहोत. अपघातग्रस्त कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी त्यांना अाधार देत त्यांचे उच्च शिक्षण कसे पूर्ण होईल हाच आमचा उद्देश असल्याचे सचिव सुशीला अालझेंडे म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...