आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला सदस्यांच्या पती‘राज’चा थयथयाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - रोहयोची कामे, पाण्याचे प्रश्न घेऊन गेलो असता जि.प.चे सीईओ बी. राधाकृष्णन् यांनी केबिनबाहेर काढल्याचा आरोप करत पंचायत समितीतील पदाधिकारी, सदस्यांच्या पतींनी मंगळवारी कांगावा केला.
एका सदस्याने असंसदीय भाषा वापरली, त्यामुळे बाहेर जाण्यास सांगितले, असे सीईओंनी म्हटले आहे. सभापती मलिका शिंदे यांचे पती रमेश, घनसावंगीचे सभापती मधुकर साळवे, उपसभापती सोपान तिरुखे, भाटेपुरीचे सदस्य यादवराव राऊत, शीला गिंभड (नेर) यांचे पती महादेव, अनिता पडूळ (आंतरवाली) यांचे पती कृष्णा, कुमोदिनी कदम (डुकरी-पिंपरी) यांचे पती दिनेश, सचिन भांदरगे (वडीवाडी), गणेश नरवडे (सेवली), अण्णासाहेब बालरस (रेवगाव), प्रेमसिंग राठोड (पिंपरखेड) यांनी अपमान झाल्याचा आरोप केला. सीईओंविरुद्ध त्यांनी केबिनबाहेर घोषणाबाजी केली.