आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निराधार महिलांचा बीडमध्ये दुर्गावतार; महिलांचे शोलेस्टाइल आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - संजय गांधी, श्रावण बाळ यासह निराधारांसाठी असलेल्या योजनांचे मानधन केवळ यंत्रणेतील दप्तर दिरंगाईमुळे रखडल्याने त्रासलेल्या महिलांनी संतप्त होत सोमवारी तहसीलच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर चढून शोलेस्टाइल आंदोलन करून दुर्गावतार दाखविला.

सोमवारी सकाळीच शेकडो निराधार महिला तहसीलच्या इमारतीवर गेल्या. दहाच्या सुमारास कर्मचारी, नागरिकांचे कार्यालयात येतानाच आंदोलक महिलांनी लक्ष वेधून घेतले. तहसीलदार ज्योती पवार यांनी कार्यालयात येताच चौकशीचे आदेश दिले. शिवाजीनगर पोलिसांना पाचारण केले. तहसीलदार कार्यालयात आल्याचे समजताच घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी महिलांना इमारतीवरून खाली उतरण्याची विनंती केली . मात्र तहसीलदारांनी प्रत्यक्ष येऊन आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे महिलांनी सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखवताच सर्व महिला तहसील इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात जमल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी तहसीलमध्ये येऊन आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

कारवाईसाठी उपोषण : शिरूर कासार तालुक्यातील लिंबा खांबा येथील शिंदे कुटुंबीयांच्या जागेवर गावातीलच श्रीराम नागरगोजे अतिक्रमण करू पाहत आहेत. नागरगोजे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
औषधनिर्माता संघटनेचा संप : आरोग्य सेवेतील औषधनिर्माण अधिकार्‍यांंना सहाव्या वेतन आयोगाची केंद्र शासनानुसार वेतनश्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी शासकीय औषधनिर्माता गट क कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुहास धाट, आदिनाथ मुंडे, योगेश जोशी, श्रीहरी फड आदी सहभागी झाले होते.

आरक्षणासाठी मराठा महासंघाचे निदर्शने
मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षणासाठी निदर्शने केली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद इंगोले, युवक जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 26 जून हा दिवस राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून आरक्षण जाहीर न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
अपात्र प्रस्ताव तपासणार
गेल्या दोन बैठकांमधून अपात्र ठरलेले 655 प्रस्ताव कोण-कोणत्या कारणांनी अपात्र ठरले आहेत याची प्रत्येक फाइलची तपासणी करणार आहे. यातून निराधारांवर अन्याय होणार नाही. कारणे तपासली जाणार आहेत, असे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिले.

निर्णय घेतला जाईल
४निराधारांच्या मानधनासंदर्भात तलाठ्यांकडून चुका झालेल्या आहेत. चुकीच्या प्रस्तावांची मंडळ अधिकार्‍यांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. त्यात 22 प्रकरणे मंजूर झाली. अन्य प्रकरणांचा बैठकीत समितीपुढे ठेवून निर्णय घेतला जाईल.’’ ज्योती पवार, तहसीलदार.