आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women's Suicide At Jalna District With 4 Years Child

काजळा येथे 4 वर्षीय मुलास जाळून आईचीही आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- घरगुती कारणावरून चारवर्षीय मुलाला जाळल्यानंतर आईनेही आत्महत्या केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील काजळा येथे उघडकीस आली. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. काजळा येथील नंदाबाई शिवनाथ हांडे (25) काही दिवसांपासून भावाकडे राहत होती. दरम्यान, 6 मे रोजी ती पुन्हा काजळा येथे राहण्यास आली. मंगळवारी रात्री तिने आपला चारवर्षीय मुलगा बंटी ऊर्फ योगेशला रॉकेल टाकून पेटवून दिले. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नंदाबाईनेही पेटवून घेतले. घाटीत उपचारादरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला.