आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात आजपासून दोन दिवस होणार श्रमिक साहित्यावर मंथन; डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते उद््घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कष्टकऱ्यांच्या जीवनाचे वास्तवदर्शी चित्र मांडणाऱ्या श्रमिकांच्या साहित्याचा गौरव करण्यासाठी व या वर्गातील साहित्यिकांना नवे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जालना शहरात आजपासून दोनदिवसीय राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातून जवळपास पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.   

स्टील आणि बियाणे उद्योगामुळे उद्याेगनगरी अशी ओळख निर्माण झालेल्या जालना शहरात रविवारपासून हे संमेलन होत आहे. येथील रेल्वेस्टेशन उड्डाणपूल येथे असलेल्या शगुन मंगल कार्यालयात त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनस्थळाला कॉ. प्रभाकर संझगिरी साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्र सिटूच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक, कामगार व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अाणि त्यांच्या हक्कासाठी े आवाज उठवण्याचे काम सिटू करीत आहे. त्यामुळेच श्रमिक व कष्टकऱ्यांच्या साहित्याला व्यासपीठ मिळवून द्यावे व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा हाच या संमेलनामागील उद्देश असल्याचे संयोजकांनी सांगितले. राज्यात प्रथमच असे संमेलन होत असून पुढील काळात ते कायमस्वरूपी आयोजित करण्यात येणार असल्याचे सिटूच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांना हे संमेलन समर्पित करण्यात आले आहे. रविवारी ग्रंथ सन्मान मिरवणुकीने याला सुरुवात केली जाणार आहे.  सकाळी ८.३० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अंबड नाका येथील पुतळ्याजवळून माजी आमदार नरसय्या आडम यांच्या हस्ते ग्रंथ सन्मान मिरवणुकीने संमेलनाला सुरुवात होणार आहे.  सकाळी १० वाजता साहित्यिक व इतिहासतज्ज्ञ डॉ.आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली या साहित्य संमेलनाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते उद्््घाटन हाेईल.

आज संमेलनात हे कार्यक्रम   
ग्रंथ सन्मान मिरवणूक व उद््घाटन समारंभाशिवाय रविवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत ‘कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्य:स्थिती’  या विषयावर विचारवंत पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यात महाराष्ट्र सिटूचे उपाध्यक्ष सईद अहेमद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कवी गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रतिमा जोशी, श्रीरंजन आवटे, राजकुमार तांगडे, धम्मसंगिनी यांचा परिसंवादात सहभाग असणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता प्रा. संजय लकडे हे ‘आम्ही दोघं’ ही लघुनाटिका सादर करणार आहेत. रात्री ८.३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.    
बातम्या आणखी आहेत...