आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-लातूर-परळी- नांदेड रेल्वेसाठी खंडपीठात याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळूनही सुरू न झालेल्या विस्तारित मुंबई-लातूर-परळी-नांदेड रेल्वेसाठी परळी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक मोहनलाल बियाणी यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहितार्थ याचिका दाखल केली आहे. सार्वजनिक प्रश्नावर परळी येथून प्रथमच खंडपीठात याचिका दाखल झाली असून लवकरच याचिकेवर निर्णय अपेक्षित आहे.

परळीकरांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या मुंबई रेल्वेसाठी आंदोलने करण्यात आली होती. तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी लातूर-मुंबई रेल्वेचा परळीमार्गे नांदेडपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे अर्थसंकल्पात मान्यता दिली होती. अर्थसंकल्पात मंजुरी व रेल्वे वेळापत्रकात विस्तारित गाडीची नोंद होऊनही रेल्वेमंत्र्यांनी परळीसाठीची मुंबई रेल्वे सोडली नाही. शेवटी परळीकरांच्या वतीने रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक मोहनलाल बियाणी यांनी औरंगाबाद खंडपीठात अॅड. सुरेश मुंडे व रमेश साखरे यांच्यामार्फत जनहित याचिका बुधवारी दाखल केली आहे.

आता हा मार्ग निवडला
हा प्रश्न परळी शहरापुरता मर्यादित नसून या मार्गावर असलेल्या गंगाखेड, परभणी व नांदेडच्या प्रवाशांसाठीही महत्त्वाचा आहे. परळीला मुंबईशी जोडण्यासाठी ही विस्तारित रेल्वेसेवा सुरू होणे महत्त्वाचे आहे. हा प्रश्न महत्त्वाचा असल्यानेच आम्ही आता हा मार्ग निवडला आहे.
-मोहनलाल बियाणी, याचिकाकर्ते, परळी
बातम्या आणखी आहेत...