आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभागातून जलसाक्षरता, येळगंगा नदी तुडुंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - ऐतिहासिक,पर्यटन आणि धार्मिक असे महत्त्व असलेल्या म्हैसमाळ येथून उगम पावलेल्या येळगंगा पात्रातील जलसाठ्याचे पूजन वृक्षारोपण रविवारी १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. अभिजित चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.

"दिव्य मराठी'च्या सहकार्याने हा येळगंगा अभियानाचा तिसरा टप्पा पार पडल्याचे शांतीगिरी महाराज यांनी या वेळी सांगितले. वेरूळ लेणी ते माटेगाव धरणापर्यंत येळगंगामध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढली होती, तर नदीपात्रात साेडण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण झाला होता. अशा दुरवस्थेत सापडलेल्या येळगाव नदीला मोकळा श्वास घेता यावा, त्यामुळे "दिव्य मराठी'च्या सहकार्याने १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी नदीच्या सर्वांगीण विकासकामाचा शुभारंभ १३ मार्चला केला होता. यानंतर सतत तीन महिन्यांमध्ये उद्योजक आनंद असोलकर, निश्चित शेंडे, वैभव किरगत, बीडीओ आर. एस. लाहोटी यांच्या परिश्रमामुळे नदीचे खोलीकरण, रुंदीकरणासह पाण्याचे डोह बनवण्याचा पहिला टप्पा पार केला होता.
वरुणराजानेही लोकसहभागातून झालेल्या कामाचे जणू कौतुकच करत सात जूनचा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा रविवारी जलसाठ्याचे लोकार्पण, वृक्षारोपणाने पूर्ण झाला. सरपंच रेखा ठाकरे, बालाजी शेवाळे, शिवलाल पुरभे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...