आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजार हेक्टर येणार ओलिताखाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - येळगंगा नदीपात्रामध्ये झालेले अतिक्रमण, उगवलेली झाडेझुडपे सोडण्यात येणार्‍या दूषित पाण्यामुळे नदीची झालेली वाताहत पाहता ‘दिव्य मराठी’ने सलग तीन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यास प्रत्यक्ष यश येताना दिसत आहे. येळगंगा नदीच्या खोलीकरणाचे काम प्रगतिपथावर असून यासाठी लोकसहभागासह सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू असल्याने यंदा नदी परिसरातील सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी, महामंडालेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ मार्चपासून प्रारंभ झाला. तीन आठवड्यांमध्ये साधारण दीड किमीच्या वर या नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे.

एककोटी लिटर पाणी अडवण्यात येणार
ऐतिहासिकयेळगंगा नदीचा विकास करताना मोठ्या प्रमाणात पाणी अडवून जिरवण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये या नदीवरील पहिल्या टप्प्यात आश्रम परिसरातील मोठा केटी वेअर स्वच्छ करण्यात आला आहे. यामध्ये एक कोटी लिटर पाणी अडवण्यात येणार आहे. या पाण्याचा वेरूळ, कसाबखेडा, तळ्याची वाडी, शहजतपूर, मुंबापूर, मलकापूर २, शार्दूलवाडी, माटेगावसह परिसरातील दहा हजार हेक्टर ओलिताखाली येईल. यामध्ये २७१५.२९ हेक्टर इतके क्षेत्र साधारण ४०५ विहिरी एकट्या वेरूळ गावाच्या आहेत.

येळगंगा नदीच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, जय बाबाजी भक्त परिवार आदींसह सर्व स्तरातून मदतीचा ओघ असल्याने विकास शक्य झाला.

दोन केटी वेअर मंजूर
यानदीचा सर्वांगीण विकास करत असताना जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा परिषदेने प्रत्येकी १३ लाख रुपये निधीचे दोन केटी वेअर मंजूर केले आहेत.

प्रयत्नशील मनुष्यबळ
सीईओ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डेप्युटी सीईओ सोळंकी, सहायक बीडीओ विठ्ठल हरकळ, आनंद असोलकर, जि. प. सदस्य शैलेश क्षीरसागर, मंगेश जगताप, निश्चल शेंडे, पुष्पानंद गायकवाड, उपसरपंच किरण काळे, ग्रामसेवक बी. आर. म्हस्के, संजय सुर्वे.

कर्मचार्‍याची नियुक्ती करावी
यानदीपात्रावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे या कामास अडचणी येत असल्याने या नदीच्या विकासाकरिता महसूल प्रशासनाने तलाठी मंडळ अधिकार्‍यांना आदेश दिले तर या कामात अतिक्रमणधारक अडचणी आणणार नाहीत.
सांडपाणी थांबणे गरजेचे

यानदीपात्रामध्ये अनेक ठिकाणांहून सांडपाणी सोडण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत आहे. या नदीचा विकास होत असला तरी संबंधितांकडून सांडपाणी थांबवलेले नाही. यामुळे प्रशासनाने कडक पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.

जलयुक्त अभियानास नदीचे वावडे
जलयुक्तशिवार अभियानांतर्गत वेरूळ या गावाची निवड झाली आहे, पण शासन लाखो रुपये खर्च करून अन्य ठिकाणी कामे घेत आहे. परंतु या नदीपात्राच्या स्वच्छतेसंदर्भात काही कामे करण्याकरिता उदासीन दिसत आहे. त्यातच प्रशासनाकडून नियम दाखवण्यात येत आहे.

आतापर्यंत आलेला निधी
जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह २३ अधिकारी, कर्मचार्‍यांनी ५६ हजार रुपये दिले. महराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे लाख रुपये, तर घृष्णेश्वर देवस्थानतर्फे दहा दिवस जेसीबी, माती उचलण्यासाठी जनार्दन स्वामी आश्रमातर्फे चार ट्रॅक्टर
उपसा सिंचन योजना राबवावी
अडवण्यातयेणार्‍या पाण्याची नासाडी करता परिसरातील शेतकर्‍यांनी एकत्रित येत उपसा सिंचन योजना राबवावी याकरिता सहकार्य करू. शांतीगिरीमहाराज

...तर शेकडो लिटर पाणी थांबेल
येळगंगानदीचा सर्वांगीण विकास करताना ती डमडम तलावामध्ये वळवली तर शेकडो लिटरच्या या तलावामध्ये पाणी थांबेल हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. शैलेशक्षीरसागर, सदस्य, जि. प.

लोकसहभाग गरजेचा
या नदीचा वेरूळ लेणीपासून माटेगाव धरणापर्यंत सर्वंगीण विकासाकरिता लोकसहभागासह अनेक ठिकाणी निधी मिळणे गरजेचे आहे. या सामाजिक कार्याकरिता पुढे येणे गरजेचे आहे. आनंदआसोलकर, उद्योजक

असा पाठपुरावा विकासास प्रारंभ
- जुलै२०१२ रोजी‘अतिक्रमणामुळे ऐतिहासिक येळगंगेचे अस्तित्व धोक्यात’ या मथळ्याखाली प्रथम वृत्त प्रकाशित करत सलग तीन वर्षे पाठपुरावा
- मार्च२०१५ रोजीउपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी, गटविकास अधिकारी आर. एस. लाहोटी उद्योजक आनंद असोलकर सहकारी यांची ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी चर्चा नदीपात्राच्या वस्तुस्थितीची पाहणी
- मार्च२०१५ रोजीस्वामी शांतीगिरी महाराजांसोबत नदीच्या विकासाविषयी संपूर्ण टीमची चर्चा
- १३मार्च २०१५ रोजीकामाचा शुभारंभ