आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी-पोलिसांचा योगा 'योग', ४६१ शाळांमध्ये योग दिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - तालुक्यात मंगळवारी योग दिन साजरा करण्यात आला. पण, हा दिवस पोलिस वगळता केवळ शाळेतच साजरा करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. यात तालुक्यातील ४६१ शाळेतील १२७८ शिक्षकासह ७४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले.

तर ग्रामीण पोलिसांनी मंगल कार्यालयात योग दिवस साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. मात्र, इतर कोणत्याही खासगी संस्थाने यांनी योगासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. शाळेत योग दिवस होता म्हणून सकाळीच विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. मागच्या वेळेस योग शिबिर सक्ती म्हणून चार पाच दिवस अगोदर शाळेत योगाचे क्लास शिबिर पूर्व तयारी घेतली होती.
यंदा कोणतीच सक्ती शिक्षकांवर नसल्याने त्यांनी साध्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

शाळेत योगाचे धडे घ्यावे
योगाने शरीरच नाहीत तर मनाचे पण शुद्धीकरण होत असते. शरीर, मन शुद्ध तर कामातही शुद्धता दिसेल. तसेच अभ्यासात मन लागेल. योग दिवस शिक्षकांनी वर्षातून एकदा न घेता आठवड्यातून तीन चार वेळेस घ्यावा. विद्यार्थ्यांना सवयी लागून जाईल. यात विद्यार्थ्यांची प्रकृती सुदृढ होईल. - शंकरराव शिंदे, एपीआय, सिल्लोड.
बातम्या आणखी आहेत...