आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीत स्फोटसदृश घटनेत प्राध्यापकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - वसमत रस्त्यावरील आनंदनगर भागात उच्चशिक्षित युवकाचा जळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. प्रथमदर्शनी स्फोटासारख्या वाटणार्‍या प्रकाराबाबत पोलिसांनी मात्र हा स्फोटाचा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले असून पोलिस कोणत्याही ठाम निष्कर्षाप्रत पोहोचू शकलेले नाहीत. अतुल भगवान वाघमारे (२८) असे मृताचे नाव आहे.

पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील अतुल व अमोल हे दोन जुळे भाऊ असून दोघेही उच्चशिक्षित आहेत. दोघांचेही शिक्षण रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवीपर्यंत (एमएस्सी ) झालेले आहे. अतुल हा अंबाजोगाई येथील खासगी महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करीत असून भाऊ अमोल हा परभणी येथीलच पॉलिटेक्निक महाविद्यालयात कार्यरत आहे. या दोघांसह त्यांचे दोन चुलत भाऊदेखील परभणी येथेच वास्तव्यास आहेत. हे चौघेही आनंदनगरातील प्रा.डॉ.एल.एम.करंजकर यांच्या घरी भाडेतत्त्वावर पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये राहतात. रविवारी सकाळी अमोल नाष्ट्यासाठी गेला, तर बारावीस असलेले दोन चुलत भाऊदेखील महाविद्यालयात गेले होते. खोलीत अतुल वाघमारे एकटाच होता.

दहा वाजता खोलीतून धुराचे लोट येऊ लागल्याने शेजार्‍यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक सचिन देशमुख यांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्पूर्वीच झोपलेल्या अवस्थेत असलेल्या अतुल वाघमारेचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अनंत रोकडेसह एटीएस पथकानेही पाहणी केली.