आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशच्या तरुणाकडून पिस्तूल, १४ काडतुसे जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटोदा- शहरातील चोरीच्या आरोपात पोलिसांनी चार जणांना अटक केली असून यातील मध्य प्रदेशातील तरुणाकडून दोन गावठी पिस्तूल व १४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
दोन दिवसांपूर्वीच पाटोदा येथील शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील आठ दुकाने फोडून चोरांनी ९५ हजार रुपयांचा एेवज लांबवला होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी चाेरांनी आणखी तीन ठिकाणी चोऱ्या केल्या. शहरात चोरीच्या अकरा घटना घडल्याने पोलिसांसमोर तपासासाठी आव्हान उभे राहिले. आरोपीच्या अटकेसाठी तपास यंत्रणा कामाला लागली. गुरुवारी पोलिसांनी शिवाजी चौकातील जय मल्हार हॉटेलमध्ये मध्य प्रदेश येथील संशयित तरुण जगदीश रालिया बोराडे (२५, रा. दुधवाडा, ता. नेवाले) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे दोन पिस्टलसह १४ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्या बरोबरच सय्यद जमीर सय्यद शहा (४०, रा. माउलीनगर, पाटोदा), धनंजय सुदाम अडागळे (२५, रा. पाटोदा) या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक एस. डी. हुंबे यांनी पाटोदा ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंद झाला आहे. याच दिवशी पाटोदा बसस्थानकात बापूसिंग मखमलसिंग टाक (४५, रा. चिखली, ता. पाटोदा) याला तलवार घेऊन फिरत असताना बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सी. डी. शेवगण यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाटोदा येथील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे.

पाच दिवसांची कोठडी
चोरीच्या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना पाटोदा येथील न्यायालयासमोर शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...