आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: विडा गावातील 25 वर्षीय तरुणाचा विहरीत बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज:  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विडा येथे पाणी काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या २५ वर्षीय तरुणाचा तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव अमर देवीदास पटाईत ( वय २५ ) असे आहे. विडा येथील ३३ के. व्ही. विद्युत केंद्राजवळ पटाईत यांची शेती आहे. शुक्रवारी दुपारी १२.३०  वाजेच्या सुमारास जनावरांना पाणी पाजण्यासाठी अमर पटाईत हा तरुण विहिरीवर गेला असतांना  विहिरीतून घागर भरुन काढीत होता. मात्र विहरीत तोल गेल्याने पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने अमरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एक बैल बाजूला गेल्याने त्याला आणण्यासाठी त्याचे वडील गेले होते. बैल घेऊन येईपर्यंत ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची केज पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...